विशेष मुलांच्या हातून साकारल्या गोमयाच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने अभिनव उपक्रम

4

पुणे : गणेशोत्सवाचा डिजिटल व सामाजिक उत्साह आणि पर्यावरण संवर्धन यांचा एक अत्यंत सुंदर संगम कोथरूडमध्ये पाहायला मिळत आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमध्ये गोमयापासून (गायीच्या शेणापासून) अत्यंत आकर्षक पद्धतीने तयार केलेल्या श्री गणेशमूर्ती गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, शेतातील माती, शेण आणि पूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर करून या देखण्या गणेशमूर्ती ‘झेप सामाजिक संस्था’च्या विशेष (दिव्यांग) मुलांनी स्वतःच्या हातांनी साकारल्या आहेत. या विशेष मुलांच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हातातील कौशल्याला समाजाने प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेता यावे, या पवित्र उद्देशाने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची पारंपारिक आणि शाश्वत परंपरा जपत, समाजातील एका विशेष घटकाला बळ देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला आहे. या विशेष मुलांनी घडवलेल्या बाप्पाच्या मूर्तींना कोथरूडमधील गणेशभक्तांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.