कोथरुडमध्ये महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन; हर्षदा फरांदे यांचा कौतुकास्पद उपक्रम

10

पुणे : गणेशोत्सवाच्या आनंदी व पवित्र पर्वावर कोथरुडमधील महिला उद्योजिकांच्या कलागुणांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भाजप पुणे शहर महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या संयोजनातून भव्य विविध वस्तू विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कौतुकास्पद उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महिलांच्या अंगी असलेल्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांच्या अथक मेहनतीला योग्य बाजारपेठ मिळावी, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या घरगुती व्यवसायाला मोठी चालना मिळते, असे सांगत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांना आपण सदैव प्रोत्साहन आणि पाठबळ देत राहू, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात महिलांनी तयार केलेल्या विविध घरगुती वस्तू, फराळ, आणि सजावटीच्या साहित्याला कोथरुडमधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

या कार्यक्रमास नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, सरचिटणीस दीपक पोटे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री, मंडल अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, विवेक मेथा यांच्यासह मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.