पुण्यात ‘महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड’ सोहळा संपन्न; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिग्गजांचा गौरव!

9

पुणे : पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड २०२६’ सोहळ्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रात उल्लेखनीय व पथदर्शी कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला.

कौशल्याधारित शिक्षणावर भरशैक्षणिक ज्ञान आणि उद्योग जगताच्या व्यावहारिक गरजा यांमधील अंतर भरून काढण्याचा आयोजकांचा हा उद्देश अतिशय कौतुकास्पद असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता उद्योग जगताला हवे असणारे मनुष्यबळ निर्माण करणे आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन शैक्षणिक धोरणात (NEP) संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, ज्यामुळे आज या क्षेत्रात मोठी क्रांती घडून येत आहे. या सकारात्मक बदलांमुळे आणि भारतीय तरुणांच्या वाढत्या क्षमतेमुळे आता परदेशी कंपन्यादेखील भारतीय संशोधनाला मोठी पसंती देत आहेत, अशी भावना यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केली.

या सोहळ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पराग काळकर, ‘एनएसक्वेअर एक्सपर्ट्स’चे संस्थापक आणि सीईओ निलेश कंकरिया, पुण्याचे GST आयुक्त दिनेश भोईर, अतिरिक्त जीएसटी आयुक्त प्रसाद गोरासे आणि पुणे झोनचे अतिरिक्त सीमाशुल्क आयुक्त शिवकुमार साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.