सोलापूर : २०२४ सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज कसबा सोलापूरमधील मानकरी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी असतात. देशातील प्रत्येक नागरिक माननीय मोदीजींवर भरभरून प्रेम करतो. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात रामल्लांना विराजमान होण्याचे आपले अनेक वर्षांचे स्वप्न माननीय मोदीजींनी पूर्ण केले आहे. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. या वेळी विजय देशमुख, राम सातपुते यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.