चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे कोथरुड येथे संत पूजन २०२४ सोहळ्याचे आयोजन … वारीला जाणाऱ्या प्रमुख दिंड्यांच्या प्रमुखांचे पाद्यपूजन करून केले अभिवादन
पुणे : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यातर्फे बुधवारी कोथरुड येथे संत पूजन २०२४ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक सहभाग घेतला. यावेळी त्यांनी वारीला जाणाऱ्या प्रमुख दिंड्यांच्या प्रमुखांचे पाद्यपूजन करून अभिवादन केले. तसेच वारीसाठी आवश्यक साहित्य भेट म्हणून दिले.
अतिशय भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. सोबत ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनसेवेत वारकरी मग्न झाले, या सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक वारीतील प्रमुखांचे पाद्यपूजन करुन, आशीर्वाद घेतले. भक्तीमय वातावरण आणि अलोट गर्दीत संतपूजन सोहळा संपन्न झाला, तसेच चंद्रकांत पाटील यांच्या वतीने वारीसाठी आवश्यक टाळ, तंबू, सतरंजी,शबनम बॅग,छत्री व टॉर्च आदी पारमार्थिक साहित्याचे वारकरी मंडळींना वाटप केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सदाचारी जीवन जगण्यासाठी संत, महात्म्यांनी केलेल्या कार्याची महती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे मी माझे कर्तव्य समजतो. याच भावनेतून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर “संत पूजन २०२४” या उपक्रमाच्या माध्यमातुन सालाबादप्रमाणे याही वर्षी पुण्यातील वारकरी बांधवांची सेवा करण्याचे भाग्य लाभले, असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी कीर्तनाचा आनंद घेतला.भाजपचे कोथरूड विधानसभेचे सरचिटणिस गिरीश खत्री यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत महिला भगिनींच्या साठ भजनी मंडळांना प्रत्येकी ११ टाळ देण्यात आले. ७० मंदिरांमध्ये जिथे भजन केले जाते तेथे देखील बसताना गार लागू नये म्हणून त्यांना सतरंजी देण्यात आली . एकूण ७० सतरंज्या वाटप करण्यात आल्या. १२ दिंडयांना ३६ तंबूचे वाटप करण्यात आले. यासोबतच ८ ते १० हजार वारकरी बांधवांना शबनम बॅग आणि छत्री वाटप करण्यात आले.