पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. स्मिताताई जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते एबी फॉर्म सुपूर्द; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या विजयाचा निर्धार

4

पुणे : आगामी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने अधिकृतपणे शड्डू ठोकला आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते अधिकृत एबी (AB) फॉर्म सुपूर्द करण्यात आले. या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्हीही अधिकृत उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करून त्यांना निवडणुकीतील ऐतिहासिक विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

उमेदवारांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, डॉ. स्मिताताई जाधव आणि कौस्तुभ गावडे या दोन्ही उमेदवारांना शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांची सखोल जाण आहे. त्यांचा असलेला व्यापक जनसंपर्क आणि समाजासाठी तळागाळात काम करण्याची त्यांची अथांग तळमळ महायुतीची ताकद वाढवणारी असून, या निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चितच बळ देणारा ठरेल.

या अत्यंत महत्त्वाच्या राजकीय सोहळ्याप्रसंगी केंद्रीय नागरी विमानचालन आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, शरद लाड, डॉ. प्रशेम कोल्हे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समीत कदम यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख आमदार, खासदार, वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि दोन्ही मतदारसंघांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.