पुण्यात आधुनिक ‘प्रेस क्लब’ उभारणीचा मार्ग मोकळा; जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

9

पुणे :पुण्यातील पत्रकार बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे. पुणेकर पत्रकारांच्या हक्काच्या आणि जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक ‘प्रेस क्लब’ उभारणीसाठी जागा हस्तांतरणाची प्रशासकीय नोंदणी प्रक्रिया आता अधिकृतपणे पूर्ण झाली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट सूचनेनुसार आणि विशेष पुढाकारातून ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’ आणि ‘पुणे श्रमिक पत्रकार संघ’ यांच्यासाठी स्वतंत्र प्रेस क्लबकरिता ही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमिनीच्या हस्तांतरणाची कायदेशीर नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असून, आता लवकरच याठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक प्रेस क्लबच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

पुण्यातील पत्रकारितेच्या क्षेत्राला बळ देणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच ही प्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल पुण्यातील सर्व पत्रकार बांधवांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.