मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील शिक्षकांशी साधला संवाद; मतदार नोंदणीचे केले आवाहन

10

सांगली : सांगली जिल्ह्यातील पेठ येथे श्री व्यंकटेश्वर शिक्षण संस्था संचालित वनश्री नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षकांशी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिक्षकांशी सविस्तर चर्चा करत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे महत्त्व यावेळी त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्रता असूनही मतदार नोंदणी अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र पदवीधर आणि शिक्षकाने वेळेत मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

यावेळी भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे पदवीधर निवडणुकीचे सहप्रमुख शेखर इनामदार, एकनाथतात्या जाधव, शरद लाड, विलास काळेबाग, संस्थेचे सचिव राहुल महाडिक, प्रा. महेश जोशी यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.