‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन – फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न

15

पुणे : पुणे येथील ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था’ (IISER Pune) आणि ‘आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन’ (I-HUB QTF) यांच्या वतीने, प्राध्यापक व संशोधकांच्या कौशल्यवृद्धीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन – फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाला.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र असून राज्याला तंत्रज्ञानात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी या क्षेत्रातील संशोधन, प्राध्यापकांचे कौशल्यवर्धन व उद्योग-शैक्षणिक समन्वय वाढविणे गरजेचे आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, तसेच आवश्यकतेनुसार केंद्र शासनाकडूनही सर्वतोपरी सहकार्य मिळवून दिले जाईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.

तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व संशोधक व प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (IISER) संचालक प्रा. सुनील भागवत यांच्यासह राज्यातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.