कोल्हापूर: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूर येथील ‘दि न्यू एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘कौन्सिल ऑफ एज्युकेशन’ या नामांकित संस्थांचे संचालक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला.

दर सहा वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे. सुशिक्षित आणि सजग मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी या दोन्ही संस्थांमधील प्रत्येक घटकाने आपल्या स्तरावर जास्तीत जास्त मतदार नोंदणी होईल, यासाठी सक्रिय प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनसीसी (NCC) च्या विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने स्वागत केले.
या संवाद सोहळ्याला दोन्ही शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी पाटील यांचे स्वागत केले.