पुण्यात विरोधकांना मोठा धक्का; प्रमोद निम्हण, प्रल्हाद गवळी आणि डॉ. वैष्णवी किराड यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश

8

पुणे : भाजपा पुणे शहर कार्यालयात राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर संघटक प्रल्हाद गवळी तसेच यापूर्वी शिवसेना (शिंदे गट) कडून पुणे महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या डॉ. वैष्णवी किराड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. चंद्रकांत पाटील यांनी या तिघांचेही भाजपा परिवारात मनःपूर्वक स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा एका विशिष्ट विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराला सर्वोच्च प्राधान्य देत, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुण्यात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी आता एकत्र येऊन एकजुटीने कार्य करायचे आहे, असे पाटील यांनी म्हटले.

या प्रसंगी शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार हेमंत रासने, शहर सरचिटणीस दीपक पोटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष योगेश सुपेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा नेते प्रकाश तात्या बालवडकर, गणेश कळमकर, लहु बालवडकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.