मित्रपक्ष महाआघाडीची ‘जंबो चिंतन बैठक’, शेट्टी गैरहजर

2 490

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी मुंबईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आघाडीची चिंतन बैठक आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते अबु आझमी, युवा स्वाभिमानी पार्टीचे आमदार रवी राणा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, आमदार हसन मुश्रीफ, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार हेमंत टकले, आमदार अनिकेत तटकरे, शेकापचे नेते आमदार गणपतराव देशमुख, सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे नेते नसीम खान, बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर,काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे, आमदार जोगेंद्र कवाडे, गवई गटाचे राजेंद्र गवई, आदींसह आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.