कोथरूडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन… पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली कॅम्पला भेट

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज आपल्या कोथरूड मतदारसंघात भेट दिली. कोथरूड मतदारसंघात विविध उपक्रम राबविले जातात. आजही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाला भेट दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोथरुड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो. विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम मतदारसंघात राबवत असतो. आज एपीजे अब्दुल कलाम सभागृहात फिजिओथेरपी कॅम्प आयोजित केला असून, अनेक ज्येष्ठ नागरिक त्याचा लाभ घेत आहेत, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी या शिबिराला भेट देऊन, नागरिकांशी संवाद साधला. शिबिरासाठी आलेल्या डॉक्टर्सना चंद्रकांत पाटील यांनीं चॉकलेट्स वाटले आणि त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला समाधान मिळाले, असेही पाटील यांनी म्हटले.