पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

3

पुणे : पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ३१ डिसेंबर पूर्वी सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिल्याने या रजा मुदत शिक्षकांचा दिवाळी प्रमाणे ३१ डिसेंबरचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्याबद्दल शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांचे शिंदेशाही पगडी देऊन अभिनंदन केले. तसेच, सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांचे अभिनंदन करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या.

पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले. शिक्षण सेवकांना कायम सेवेत करण्यासाठी शासनाने नुकताच आदेश जारी केला आहे. या निमित्ताने घोले रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात या शिक्षण सेवकांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पाटील यावेळी म्हणाले कि, राज्य सरकार हे सर्व सामन्यांप्रती समर्पित सरकार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ करून १६ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ पुणे महापालिकेच्या सर्व रजा मुदत शिक्षकांनाही मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साकात्मक भूमिका घेत दिलासा दिला आहे. नियुक्ती पत्र डिसेंबरपूर्वी मिळणार असल्याने वर्षाअखेरीस आनंद द्विगुणित होणार आहे.
शिक्षक आपल्या कर्तव्यात कसूर बाकी न ठेवता , सुशिक्षित आणि सुदृढ समाज निर्मितीत आपली मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आयुक्त विक्रम कुमार, उपयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शिक्षण विभागाचे राजू नंदकर, संतोष वारुळे, चंद्रकांत पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे तसेच सर्व ९३ रजा मुदत शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.