मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी विजयाचा संकल्प करावा – चंद्रकांत पाटील

2
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे कॉन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या आठही वॉर्डमधील पदाधिकाऱ्यांशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.

यावेळी विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना निवडून आणणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे पाटील यांनी म्हटले. यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी विजयाचा संकल्प करावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी शहराध्यक्ष धीरजजी घाटे, आ.सुनील कांबळे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, महेंद्र भोज, सुशांत निगडे, सचिन मथुरावाला, महेश पुंडे, दिलीप गिरमकर, प्रियंकाताई श्रीगिरी, संतोष इंदुलकर यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.