पुण्यात भाजपच्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ धडाका; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली महत्त्वाची बैठक
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा संकल्प अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. या अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पुणे शहराची आढावा बैठक पार पडली.

मोदीजींनी जनहित आणि सेवाकार्याला प्राधान्य देत देशाचा जलद विकास केला आहे. त्यांच्या याच खडतर परिश्रमांचा आणि सेवाभावी वाटचालीचा सन्मान म्हणून त्यांचा वाढदिवस ‘सेवा संकल्प’ म्हणून साजरा केला जात आहे, असे यावेळी पाटील म्हणाले. या उपक्रमाअंतर्गत पुण्यात ही विविध कार्यक्रम सुरु आहेत. ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी नियोजन करावे, असे आवाहन देखील त्यांनी सर्वांना केले.
यावेळी सरचिटणीस आणि अभियान प्रमुख सुशील मेंगडे, पुनीत जोशी, रविंद्र साळेगावकर, दीपक पोटे, राघवेंद्र (बापू) मानकर, महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा लडकत, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, कोथरुड मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, सचिन पाषाणकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित उपस्थित होते.