पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रभाग ३५,१८ आणि २८ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी “अब की बार ४०० पार” चा नारा दिला आहे. मोदीजींचा हा ४०० पार चा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये महाविजयाचा संकल्प, तोंडामध्ये साखर ठेवून, पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्क साधावा. पर्वती विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी विजयी करण्याचे पाटील यांनी आवाहन केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आ. माधुरीताई मिसाळ, दीपकबाबाशेठ मिसाळ, राजेंद्र शिळीमकर, प्रशांत दिवेकर यांच्या सह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.