पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करा – चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरुड मतदारसंघातील प्रभाग १२ मध्ये आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, दक्षिण कोथरुड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह इतर मान्यवर आणि भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!