पुणे : लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्राचाराची सांगता सभा शिवाजीनगर मधील कुसाळकर चौकात शनिवारी संपन्न झाली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. या योजनांचे कोट्यवधी लाभार्थी आहेत. आपले जीवनमान सुधारण्यात माननीय मोदीजींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. मेधाताई कुलकर्णी, आ. सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या सह इतर महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.