उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पर्वती मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची जाहीर सभा संपन्न

20

पुणे : लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पर्वती मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना ऐतिहासिक मतांनी विजयी करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. प्रचंड संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय पंतप्रधान +नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यास उत्सुक असल्याची साक्ष देणारा होता. यावेळी देवेंद्रजींनी देशाला मोदी सरकारची असलेली गरज आणि पुण्याच्या विकासाबाबत असलेली भाजपाची कटीबद्धता स्पष्ट केली.
यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरीताई मिसाळ, मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जगदीश मुळीक, बाबा मिसाळ यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी, मा. नगरसेवक, कार्यकर्ते आणि प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.