‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ महाडमधील प्रत्येक गरजू महिले पर्यंत पोहोचविण्याचा आमदार गोगवलेंचा निर्धार
महाड: मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आणि नुकतेच त्यातील काही अटी देखील शिथिल करण्यात आल्यावर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यातील विविध विभागात पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून महाड विधानसभा मतदारसंघातील बिरवाडी, महाड शहर तसेच मतदार संघातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची नाव नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक नोंदणी शिबिराचे आयोजन भरत गोगावले यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे हि योजना शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार भरत गोगावले यांच्या पत्नी, मा. जिल्हा परिषद सदस्य सौ.सुषमा गोगावले व सुष्ना सौ. साधना विकास गोगावले यांनी केला आहे.
राज्यातील निराधार तसेच अल्प उत्पन्न गटातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार असून दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. महाड सारख्या 50% टक्केहून अधिक महिलांचे मतदान असणाऱ्या मतदार संघात निश्चितच ही योजना गेम चेंजर ठरणार आहे. महाड विधानसभा मतदार संघातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विविध ठिकाणी नोंदणी अभियान राबविल्याने महिलांकडून आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार महिला मानत आहेत.
या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिले, अटी कमी केल्या आणि मुदत देखील वाढवली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला नोंदणीसाठी बाहेर पडत असून महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करीत आहेत.