विठ्ठलवाडीच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात चंद्रकांत पाटील यांनी बा विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे घेतले दर्शन

42

पुणे : आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पुण्यातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडीच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बा विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. सर्वांना आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

यावेळी मंदिरातील भाविकांना प्रसादवाटप करून विठुरायाचरणी सेवा अर्पण करण्याचे भाग्य लाभल्याने अतीव आनंद झाला असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पुणेकरही या दिवशी विठ्ठलवाडीतील मंदिरात जाऊन पांडूरंगाचे आणि रखुमाईचे दर्शन आवर्जून घेतात. यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.