कोथरुड मधील लेकींच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील  – चंद्रकांत पाटील

25
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आषाढी एकादशी निमित्त तेथील विठ्ठल रखुमाईच्या मंदिरांना भेटी दिल्या. दरम्यान त्यांच्या कोथरुड मधील केळेवाडी भागातील विठ्ठल मंदिराच्या सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील केळेवाडी भागातील विठ्ठल मंदिराला सभागृहाच्या बांधकामासाठीआमदार विकास निधीतून निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा पाटील यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी मानसी उपक्रमातील लेकींशी पाटील यांनी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले. कोथरुड मधील लेकींच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.