राष्ट्रीय सेवा योजना, तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो कार्यक्रम समन्वयक तथा संचालकांची एक दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

123

पुणे : आज पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS), तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो कार्यक्रम समन्वयक तथा संचालकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटन करून ‘विकसित भारत क्विज’ स्पर्धेच्या पत्रकाचे अनावरण केले.

राज्यातील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रासेयो स्वयंसेवकांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांची दिवाळी आनंदी व्हावी, यासाठी सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. रासेयो स्वयंसेवकांची संख्या वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली.

या प्रसंगी रासेयो महाराष्ट्र व गोवा विभागाचे अजय शिंदे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद काळे, प्रसेनजित फडणवीस, सचिव ज्योती भाकरे, प्रा. डॉ. सदानंद भोसले, रविंद्र शिंगणापूरकर, नितीन घोरपडे, संजय चाकणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.