गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘मानसी-प्रेरणा फाउंडेशन’ची डिजिटल भरारी; महिलांसाठी ‘मानसी संवाद’ पॉडकास्टचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक
पुणे : महिलांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्यासमोरील दैनंदिन अडचणी आणि विविध आव्हानांवर मात करण्यासाठी तज्ज्ञांचे हक्काचे मार्गदर्शन मिळवून देणे, हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर ‘मानसी-प्रेरणा फाउंडेशन’ एका नव्या रूपात आणि एका नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. संस्थेच्या वतीने महिलांसाठी ‘मानसी संवाद’ हा विशेष पॉडकास्ट (Podcast) उपक्रम सुरू करण्यात आला असून, या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनापासून आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. “हा केवळ एक संवाद नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सक्षमीकरणाचा एक नवा मार्ग असेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

या नव्याने सुरू झालेल्या पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये ‘मानसी-प्रेरणा फाउंडेशन’च्या संचालिका आणि प्रसिद्ध योगगुरू मुग्धाताई भागवत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या पहिल्या भागामध्ये त्यांनी अत्यंत मोलाचे विचार मांडले आहेत. फाउंडेशनने सुरुवातीच्या काळापासून आजतागायत तळागाळातील आणि वस्ती पातळीवरील महिलांसाठी केलेला संघर्षमय आणि खडतर सेवाप्रवास त्यांनी उलगडला. तसेच ‘योगसाधने’मुळे आजच्या आधुनिक युगातील युवती तसेच महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये कसा सकारात्मक बदल घडून आला, यावर त्यांनी अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
या डिजिटल उपक्रमाचे कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मानसी-प्रेरणा फाउंडेशनने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून महिलांच्या आरोग्याचा आणि सक्षमीकरणाचा विषय पॉडकास्टच्या माध्यमातून मांडला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आपल्या समाजातील सर्व माता-भगिनींना या ‘मानसी संवाद’ उपक्रमाचा नक्कीच मोठा लाभ होईल आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाला एक निरोगी व नवी दिशा मिळेल असे पाटील म्हणाले.
या पॉडकास्टच्या पहिल्या भागाला सोशल मीडिया आणि महिला वर्गाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून, फाउंडेशनच्या या नव्या डिजिटल भरारीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ह्या पहिल्या भागाची लिंक…पुढीलप्रमाणे :