बाणेरच्या म्हाळुंगे गावातील रस्ते, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनसंदर्भात समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

5

पुणे : बाणेरच्या म्हाळुंगे गावातील रस्ते, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनसंदर्भात समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी ऑर्चिड हॉटेल ते व्ही.टी.पी. प्रोजेक्टपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण आणि ड्रेनेज-पावसाळी लाईन टाकण्याची मुख्य मागणी त्यांनी केली.

​या समस्येबाबत तातडीने दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषाताई नागपुरे आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून निधी उपलब्ध करण्याच्या व कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. म्हाळुंगे गावातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

​या प्रसंगी भाजप नेते गणेश कळमकर, माजी सरपंच रेखाताई पाडळे, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, उद्योजक सोपानराव पाडळे, सुरेश पाडळे, सचिन पाडळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.