‘इंटर्नशिप आणि ऑन-द-जॉब ट्रेनिंग (OJT) रेडीनेस’ या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न
पुणे : महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने आयोजित ‘इंटर्नशिप आणि ऑन-द-जॉब ट्रेनिंग (OJT) रेडीनेस’ या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. इंटर्नशिप आणि ऑन-द-जॉब ट्रेनिंग (OJT) ही केवळ शैक्षणिक संकल्पना नसून विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडणारा प्रभावी दुवा असल्याचे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.
या कार्यशाळेत उपस्थित राज्यभरातील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि विषयतज्ज्ञ यांनी या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यशाळेतून मिळणारे मार्गदर्शन राज्यातील प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेसाठी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी (IAS), NEP 2020 टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, MSFDA चे कार्यकारी संचालक डॉ. शैलेन्द्र देवळणकर यांच्यासह बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग) चे संचालक डॉ. पी. एन. जुमळे, उपसंचालक डॉ. एन. एन. वाघोडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात, लोकमत समूहाचे ग्रुप एडिटर विजय बावीस्कर, उद्योजक महेश बाबक, माजी प्राचार्य अनिल राव, यशस्वी समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आणि AEDP टास्क फोर्सचे अध्यक्ष भरतदादा अमळकर उपस्थित होते.