माइंडलिफ्ट एआय इन्स्टिट्यूट’ यांसारख्या संस्थांमधून एआय क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ घडेल, याची मला खात्री – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे येथे ‘माइंडलिफ्ट एआय इन्स्टिट्यूट’ (Mindlift AI Institute) चे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात पाऊल टाकताना, केवळ तांत्रिकच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी उपयुक्त अशा ‘सायबर सेक्युरिटी’ या नॉन-टेक्निकल कोर्सचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, एआय (AI) तंत्रज्ञानाच्या विस्तारणाऱ्या शाखांमुळे आज वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडत आहे. सोलापूरचा पालकमंत्री असताना पंढरपूर वारीमध्ये भाविकांची अचूक गणना करण्यासाठी आम्ही एआयचा प्रभावी वापर केला होता; हीच या तंत्रज्ञानाची खरी ताकद आहे. मात्र, हे तंत्रज्ञान प्रभावीपणे चालवण्यासाठी कुशल हातांची गरज आहे. यांसारख्या संस्थांमधून एआय क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ घडेल, याची मला खात्री असल्याचे पाटील म्हणाले.
याप्रसंगी डॉ. प्रताप डिघावकर, श्रीजन पाल सिंह, महेश शिंदे, पूजा आहिरे, आचल आगवणे, रमेश आगवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.