एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

7

पुणे : पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. राज्यातील २६ जिल्ह्यांमधून ३०० हून अधिक बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, युवा खेळाडूंमधील बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्पर्धात्मकता पाहून अत्यंत समाधान वाटले असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

दुसऱ्या फेरीअखेर मुलांच्या गटात वीरेश शरणार्थी, मानस गायकवाड आणि राम परब यांनी आघाडी कायम राखली असून, मुलींच्या गटात श्रेया हिप्परगी, श्रद्धा बजाज आणि सई पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे पाटील यांनी म्हटले. सर्व विजयी खेळाडूंचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन!

बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून संयम, नियोजन आणि निर्णयक्षमता विकसित करणारा बौद्धिक व्यासपीठ आहे. राज्यातील युवा खेळाडूंना अशा दर्जेदार स्पर्धांमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची मोठी संधी मिळेल, असा विश्वास असल्याचे देखील पाटील यांनी यावेळी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.