मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये नोकरी मेळावा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन; कचरा संकलन वाहनांचेही पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : कोथरूड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज समर्थ युवा फाऊंडेशन, फ्लिटगार्ड आणि एमएनजीएल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर, नोकरी मेळावा तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमांचे उद्घाटन करून सहभागी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याच प्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘स्वच्छ कोथरूड’ अभियानाला अधिक बळ देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कचरा संकलन वाहनांचे लोकार्पणही पाटील यांनी केले. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक कोथरूड घडविण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे वक्तव्य यावेळी पाटील यांनी केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिकांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक आभार.
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, समर्थ युवा फाऊंडेशनचे राजेश पांडे व सरोज पांडे, फ्लिटगार्डचे निरंजन किर्लोस्कर व संजय कुलकर्णी, एमएनजीएलच्या इंडिपेंडंट डायरेक्टर बागेश्री मंठाळकर, पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अल्पना वर्पे, नगरसेविका रुपाली पवार तसेच नगरसेवक सुनील पांडे, दिनेश माथवड, दिलीप वेडे-पाटील, निलेश कोंढाळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.