‘आदर्श इन्स्टिट्यूट’मध्ये रंगली भाजपची रणनीती; संघटनात्मक बळकटीकरण आणि प्रभावी नियोजनावर भर

12

सांगली : विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरला भेट देऊन खानापूर व विटा परिसरातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी प्रदेशाध्यक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बळकटी, प्रभावी जनसंपर्क आणि विजयासाठी आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या. निवडणुकीच्या रणधुमाळीत खानापूर आणि विटा हा परिसर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनात्मक बळकटीकरण, प्रभावी नियोजन, प्रचाराची दिशा आणि विजयासाठी आवश्यक धोरणात्मक सूचना प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आल्या. आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मोदी सरकारच्या १२ वर्षांतील कामगिरीचा आढावा मांडणाऱ्या ‘विकसित भारताचा संकल्प’ या माहितीपत्रकाचे देखील अनावरण करण्यात आले. या पत्रकाच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांतील भारताच्या प्रगतिपथावरील वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला आहे.

याप्रसंगी मंत्री जयकुमार गोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज, माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे,आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, खासदार संजय काका पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुहास बाबर, भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम, सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पृथ्वीराज बाबा पाटील , सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव सदाशिवराव पाटील यांच्यासह पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी व भाजपा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.