कोथरूडमध्ये ‘समर्थ युवा फाउंडेशन’च्या नव्या कार्यालयाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; सामाजिक कार्याला मिळणार अधिक गती

7

पुणे : युवकांचे सक्षमीकरण आणि सामाजिक हिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी कोथरूड मतदारसंघात एक नवे पाऊल उचलण्यात आले आहे. कोथरूड येथे ‘समर्थ युवा फाउंडेशन’ च्या नूतन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी फिती कापून आणि दीपप्रज्वलन करून कार्यालयाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. समर्थ युवा फाउंडेशनने आजवर राबवलेल्या विविध कौतुकास्पद सामाजिक कार्याचा आढावा या सोहळ्यात घेण्यात आला.

नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी फाउंडेशनच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजहित, युवक सक्षमीकरण आणि विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘समर्थ युवा फाउंडेशन’ कोथरूड परिसरात करत असलेले कार्य निश्चितच अत्यंत प्रेरणादायी आहे. या नव्या हक्काच्या कार्यालयामुळे त्यांच्या सेवाकार्याचा विस्तार अधिक वेगाने होईल. मंत्री पाटील यांनी पुढे बोलताना, फाउंडेशनची समाजाप्रती असलेली ही पवित्र बांधिलकी आगामी काळात अधिक व्यापक व समृद्ध होत जावो, अशा मनःपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.