भाजपला मोठा धक्का; उल्हासनगरमधील २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
उल्हासनगर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवारी उल्हासनगर शहरात आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ‘कलानी महल’ येथे पप्पू कलानी याची भेट घेतल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. भाजपच्या चिन्हावर गेल्या निवडणुकीत निवडून आलेले उल्हासनगर महापालिकेतील २२ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे कलानी कुटुंबात कुणीही नव्हते. त्यामुळे भाजपपासून दुरावलेल्या ओमी कलानी आणि पूर्वाश्रमीच्या पप्पू कलानीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याचे दिसत होते. भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी पप्पू कलानीने पंधरा दिवसांपूर्वी चर्चा केली होती. आयलानी यांनी याच वेळी भाजप प्रवेशाचे आमंत्रण दिले होते.
टीम कलानींचं महाविकास आघाडीला मतदान
उल्हासनगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपच्या सात नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं. त्यामुळे भाजपला सर्व समित्या गमवाव्या लागल्या होत्या. टीम ओमी कलानीच्या 9 नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान करत शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना महापौर म्हणून निवडून आणलं.
त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. हे नगरसेवक टीम ओमी कलानीचे असले, तरी ते भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले असल्यानं तांत्रिकदृष्ट्या ते भाजपचे होते. त्यामुळे त्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करत भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी याचिका दाखल केली होती.
Read Also :
-
तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना…
-
मोठी बातमी: फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ ला ठाकरे सरकारकडून क्लीन…
-
नवाब मलिकांचा मोठा खुलासा; जातप्रमाणपत्रानंतर आता वानखेडेच पहिल्या लग्नाचे…
-
राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार; नितेश राणे यांचा शिवसेनेवर…