पेट्रोल, डिझेलची दरवाढआपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला टोला
मुंबई: इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला. एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढं वाढलं, डिझेलचे भाव तेवढे झाले. तसं नाहीये. हे आपल्या भल्यासाठीच होतंय, असा चिमटा काढतानाच मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असं म्हणता. पण मी खरं की खोटं बोलतो हे तुम्ही सांगा. इंधन परवडेनासं झालं तर तुम्ही म्हणतात तसं प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
Launch of Final Report of Comprehensive Transportation Study https://t.co/Vx48xpRzW2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 28, 2021
तसेच वारंवार केंद्र सरकारकडून इंधनाची दरवाढ केली जात असल्याने इंधन परवडेनासे झाले आहे. शासन, प्रशासन आपल्या सर्वांची जबाबदारी एक असते. अशावेळी राजकारण एका बाजूला ठेवायचे असते. जनतेला सोयी सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. ते पार पाडताना त्यात राजकारण येऊ नये. येऊ देणारही नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
Read Also :
-
जलयुक्त शिवारला क्लीन चीट देण्याचा प्रश्नच नाही; ठाकरे सरकार कडून मोठा खुलासा
-
बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं; क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना…
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का: मावस भावाच्या घरावर ईडीकडून छापा
-
समीर वानखेडेंच्याविरोधात अखेर ठाकरे सरकारची चौकशीची घोषणा; 25 कोटी रुपयांच्या…