हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक करणार गौप्यस्फोट ; राज्यात भाजपच्या नेत्यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही!
मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचं सूचक इशारा दिला आहे. अधिवेशनात माझ्यावर नाव घेऊन आरोप होतील. त्या आरोपांना उत्तर देताना अशी काही माहिती समोर आणणार आहे की ज्यामुळे भाजपच्या नेत्यांना राज्यात कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले.मलिक यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी आज मुंबईत पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करताना खळबळजनक दावे केले. भाजपच्या बऱ्याच लोकांचे बरेच कनेक्शन या ड्रग्ज प्रकरणात आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला. दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा क्रूझ पार्टीच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या काशीफ खानचा उल्लेख करत भाजपला लक्ष्य केलं.
काशिफ खानच्या अटकेनंतर अनेकांचा चेहरा समोर येईल. त्याच्याकडे किती लोकांचा पैसा आहे. त्याच्या माध्यमातून काय काय होते. त्याची कसून चौकशी होणं गरजेचं आहे बरंच काही समोर येईल, असं नवाब मलिक म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही नेत्याचा उल्लेख केला नाही. माझ्याकडे काही हत्यार राहू द्या.
हिवाळी अधिवेशन वादळी होणार आहे. आता बोललो तर कोर्टात जातील. विधानसभेमध्ये जे काही आरोप होणार आहेत. त्यावर मी उत्तर देताना जे काही समोर आणणार आहे, त्यामुळे भाजपच्या नेत्यांना राज्यात तोंड दाखवणं कठीण होऊन जाईल, असं नवाब मलिक म्हणाले.
Read Also :