सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघ विजेता… पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाला पुरस्कार वितरण

पुणे  : देशात विविध खेळांना प्रोत्साहन देण्यात येत असून त्याअंतर्गत रोलबॉलच्या ६ व्या विश्वकरंडक स्पर्धेचे २१ एप्रिलपासून पुण्यात आयोजन करण्यात आले. राजू दाभाडे यांनी हा खेळ पुण्यात विकसित केला असून हा खेळ सुमारे ५० पेक्षा जास्त देशात खेळला जात असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले .
आज महिला गटात अंतिम सामना रंगला. या सामन्यात केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करुन विजेतेपद पटकावले. त्याबद्दल केनिया संघाचे चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन. पुरुष गटातून भारत व केनिया संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून भारत व केनिया संघाला पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेचे साधन म्हणून देशात खेळाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअंतर्गत रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे २१ एप्रिलपासून पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. राजू दाभाडे यांनी पुण्यात या खेळाचा प्रसार केला असून सुमारे ५० पेक्षा जास्त देशात हा खेळ खेळला जाणे विशेष असेच आहे.

 

भारतीय संघाला कांस्यपदक
या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये इजिप्त संघाने भारताला ४-३ फरकाने पराभूत करुन अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत केनिया संघाने इजिप्त संघाचा ५-० फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकावले. केनिया संघाने सुवर्णपदक, इजिप्त रौप्यपदक आणि भारताच्या संघाने कांस्यपदक पटकावले.

याप्रसंगी पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अमिताभ शर्मा, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, आशियाई रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, भारतीय रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मनोज यादव, युगांडा रोलबॉल फेडरेशनच्या अध्यक्षा पेनिना काबेंगे, बेलारूस रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष अलेक्सी खाटीलेव्ह, क्रीडा भरतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज चौधरी, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.