कोथरूडमध्ये ‘जनता दरबार’; नागरी समस्यांचे तात्काळ निवारण करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला कडक निर्देश

9

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, नागरी समस्या आणि तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ‘जनता दरबार’चे विशेष आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी या जनता दरबाराच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या सविस्तरपणे समजून घेतल्या.

यावेळी पाटील म्हणाले, प्रशासनात पारदर्शकता आणि लोकहित जपण्यास आपले सरकार कटिबद्ध आहे. नागरिकांना प्रशासकीय स्तरावर कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आलेल्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याचे स्पष्ट व कडक निर्देश पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोथरुडच्या जनतेचे समाधान आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, हेच माझे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले.

या जनता दरबारात रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता आणि प्रशासकीय कामांशी संबंधित अनेक तक्रारी नागरिकांनी थेट आमदारांसमोर मांडल्या. या जनता दरबारात मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्यांचे अर्ज सादर केले. यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेज लाईन, कचरा व्यवस्थापन, अंतर्गत वाहतूक आणि विविध शासकीय दाखल्यांबाबत नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. मंत्री पाटील यांनी प्रत्येक नागरिकाची तक्रार स्वतः गांभीर्याने ऐकून घेतली.

Get real time updates directly on you device, subscribe now.