पं.दीनदयाळ उपाध्याय भव्य नोकरी महोत्सव व छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबिरास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज पं. दीनदयाळ उपाध्याय भव्य नोकरी महोत्सव व छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबिरास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

” रोजगारासाठी नवनवीन क्षेत्र उपलब्ध असून तरुणांनी मेळाव्याच्या माध्यमातून त्यांची माहिती करून घ्यावी आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. त्यासोबतच यावेळी विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झालेल्या तरुणांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील युवक – युवतींनी मोठ्यापरमानावर हजेरी लावत या उपक्रमात सहभाग नोंदविला.
यावेळी लोकप्रतिनिधी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला आमदार सुनिल कांबळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, महेश पुंडे उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!