कोथरुड मध्ये भारतीय जनता पक्षाचे विचार रुजविण्यात अथक परिश्रम घेतलेल्यांप्रती चंद्रकांत पाटील यांनी केली कृतज्ञता व्यक्त

6
 पुणे : श्रद्धेय अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजपा पुणे शहराच्या वतीने सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोथरुड मध्ये भारतीय जनता पक्षाचे विचार रुजविण्यात अथक परिश्रम घेतलेल्यांप्रती पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विश्वासराव हर्षे, विश्वास पाटील, बाळासाहेब शेडगे, उर्मिला ताई आपटे, भगवानराव मोहिते, जनार्दन क्षीरसागर, विलासराव बगाटे, मोहनराव शिगवण यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
 

पाटील यावेळी म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष वाढविण्यात अनेकांचे बहुमूल्य योगदान राहिले आहे. अनेकांच्या कठोर परिश्रमामुळे भारतीय जनता पक्षाचे विचार जनमानसात रुजले आणि आज पक्षाचा प्रवास इथपर्यंत पोहोचणे संभव झाला आहे. त्यामुळे अशा सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे सदैव स्मरण करणे, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, ही प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याचे पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.