पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या मतदारसंघाला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘अबनॉर्मल होम’ मधील विशेष मुलांना भेट दिली. या बालकांनी साकारलेली प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती पाहण्याचा आनंद घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांच्या आगमनाची आतूरता सर्वांनाच लागली आहे. प्रभू श्रीरामांच्या आगमनासाठी अबालवृद्ध सर्वच उत्साहाने नियोजन करत आहेत. विशेष मुले (दिव्यांग) देखील यात मागे नाहीत. माझ्या कोथरुड मतदारसंघातील ‘अबनॉर्मल होम’ मधील विशेष मुलांनी आपल्या प्रतिभेने प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. आज या संस्थेला भेट देऊन, चंद्रकांत पाटील यांनी या बालकांची कलाकृती पाहण्याचा आनंद घेतला. हे पाहिल्यानंतर त्यांच्या प्रतिभेचे कौतुक करावे तितके थोडे असे पाटील म्हणाले.