पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदार संघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. कोथरुड मधील गोररगरिबांसाठी त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. आजही पाटील यांनी आपल्या कोथरुड मधील ५० आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन वाटप केले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले कि आम्ही लहानपणी गरिबीचे चटके सोसले आहेत. दोघाही भाऊबहिणींनी कष्ट करुन शिक्षण पूर्ण केले . पाटील यांनी भावनिक आठवण सांगून अशा कष्टाचे मूल्य अधिक असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले.
यावेळी भाजपा कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षा डहाळे, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष शहर चिटणीस कुलदीप सावळेकर, कोथरूड मंडल सरचिटणीस वा महिला आघाडी च्या प्रभारी मंजुश्री खर्डेकर, प्रा. अनुराधा एडके, महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुंबरे, प्रभाग क्रमांक १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, मा. नगरसेविका वासंती जाधव, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, दुष्यंत मोहोळ, अमित तोरडमल यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.