पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. पाटील आपल्या कोथरूड मतदार संघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. आज त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोथरुड मधील आर्थिक दुर्बल कुटुंबावरचा हा ताण कमी करण्यासाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाला कोथरूडमधील लोकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, डोळे हा आपल्या शरिरातील सर्वात नाजूक, संवेदनशील आणि महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे उतारवयात याला मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. या आजारापासून मुक्त होण्यासाठी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही. मात्र, याचा मोठा खर्च असल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठांना हा खर्च करणे अवघड ठरते. या अनुषंगाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोथरुड मधील आर्थिक दुर्बल कुटुंबावरचा हा ताण कमी करण्यासाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा कोथरुडकर मोठा संख्येने लाभ घेत असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
Get real time updates directly on you device, subscribe now.