अशोक चव्हाण भाजपा पक्षबांधणी आणि संघटन मजबूत करण्यात योगदान देतील, असा ठाम विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

2
मुंबई : आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा परिवारात चव्हाण यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत म्हटले कि, अशोक चव्हाण यांच्याकडे नेतृत्वगुण आणि समाजकारणातील दांडगा अनुभव तर आहेच, पण त्यांना समृद्ध राजकीय पार्श्वभूमीही आहे. लोकांना सोबत घेऊन जाण्याची क्षमताही त्यांच्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय अशोक चव्हाण यांनी घेतला आहे. चव्हाण भाजपा पक्षबांधणी आणि संघटन मजबूत करण्यात योगदान देतील, असा ठाम विश्वास पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
फडणवीस म्हणाले कीअशोक चव्हाण यांच्या सारख्या ताकदीच्या नेत्याचा भाजपा प्रवेशाचा दिवस हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. अशोक चव्हाण यांनी दोन वेळा राज्याचे नेतृत्व केले तसेच त्यांनी राज्यातील मंत्रिमंडळात कॅबिनेट व राज्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपा व महायुतीची ताकद वाढल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.