तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी शरीरसौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार अतिशय उपयुक्त – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

22

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या.  यादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित नमो चषक २०२४ अंतर्गत कोथरुड श्री या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला पाटील यांनी भेट दिली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, तरूणांना फिटनेस व शरीर सौष्ठवाच्या लागलेल्या ध्यासाला एक सकारात्मक व हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित नमो चषक २०२४ अंतर्गत कोथरुड श्री या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाटील यांनी या स्पर्धेला भेट देऊन खेळाडुंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी शरीरसौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार अतिशय उपयुक्त असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.