उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील श्रीशंकरांचे दर्शन घेत केले प्रसादाचे वाटप

15

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. महाशिवरात्रीनिमित्त कोथरूड मतदारसंघातील सुतारवाडीतील मंदिरात पाटील यांनी श्रीशंकरांचे दर्शन घेतले. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी लाभो, भगवान महादेवांची कृपादृष्टी सर्वांवर राहो, अशी मनोभावे प्रार्थनाही केली. शक्तीचा उत्सव असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात चंद्रकांत पाटील यांनी प्रसाद वाटप देखील केले. मनात एक अनामिक ऊर्जा निर्माण झाल्याची अनुभूतीही लाभली असल्याचे पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील सोमेश्वर मंदिरात जाऊन देवांचे देव महादेव यांचे मनोभावे दर्शन घेतले. सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी प्रार्थना याप्रसंगी भगवान महादेवांच्या चरणी केली. या मंदिरात देखील पाटील यांनी भाविकांना प्रसाद वाटप केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.