राजस्थान प्रकोष्टच्या माध्यमातून पुणे शहरातील सर्व राजस्थानी बांधवांच्या एकजुटीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

14
पुणे : राजस्थान स्थापना दिनानिमित्त राजस्थान प्रकोष्टच्या माध्यमातून पुणे शहरातील सर्व राजस्थानी बांधवांच्या एकजुटीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना राजस्थान स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी आवाहन केले.
याप्रसंगी राजस्थान सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री अविनाश गहलोत, शहरी विकास आणि स्वशासन विभागाचे राज्य मंत्री झाबरा सिंह खर्रा, भाजपा राजस्थानी प्रकोष्टचे पुणे शहर अध्यक्ष सुनील गेहलोत यांच्या सह इतर मान्यवर आणि राजस्थानी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.