पुणे : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा पुणे शहरच्या माध्यमातून घर चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील डहाणूकर कॉलनी भागातील विविध घरांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, विविध घरांना भेटी देत असताना या प्रत्येक भेटीत नागरिकांकडून ज्या पद्धतीने स्वागत होते, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरील नागरिकांचे प्रेम क्षणोक्षणी प्रत्ययास येत होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे असे लक्षात येत होते की प्रत्येकानेच ठरवलंय, अबकी बार ४०० पार! त्यामुळे, मतदार बांधवांचा हा उत्साह पाहून अतिशय भारावून गेलोअसल्याचे पाटील म्हणाले . आगामी काळात त्यांचा हा उत्साह आम्हा सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जादायी ठरेल असा विश्वास वाटत असल्याचेही पाटील म्हणाले.
Get real time updates directly on you device, subscribe now.