पुणे : लोकसभेच्या पुणे आणि शिरूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हडपसरमधील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, माननीय मोदीजींनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी मनात विजयाची आस ठेवून मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान दिले पाहिजे. तसेच ‘अब की बार ४०० पार’ चा नारा देत प्रत्येक बूथवर जाऊन मतदारांशी जास्तीत जास्त संपर्क करायला हवे, असे आवाहन या प्रसंगी पाटील यांनी केले.
या वेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते.