भाजपाचे अतुल साळवे आणि रिपाइं आठवले गटाचे नेते सुखदेव अडागळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान रथाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
पुणे : भाजपाचे अतुल साळवे आणि रिपाइं आठवले गटाचे नेते सुखदेव अडागळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान रथाचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आपले विचार मांडताना म्हटले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत उपकार असून भारताच्या संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड मेहनत घेतली. ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा लोकसभेत सादर केला; तो दिवस माननीय मोदीजींनी संविधान दिवस म्हणून जाहीर केला आहे. संविधान दिनाच्या दिवशी देशभरात प्रत्येक ठिकाणी संविधानाचं पूजन केलं जातं. संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जातं. भारतीय संविधानाचा संपूर्ण जग आदर्श घेत असून संविधानामुळेच गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता महिलांना आणि गरीबांना खऱ्या अर्थानं मताचा समान अधिकार मिळाला आहे,असे मत याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केले.