पुणेकरांना निःशुल्क शिव-सृष्टी पाहण्याची अनोखी संधी… कोथरुडकरांना हि अनोखी संधी उपलब्ध करून देताना विलक्षण आनंद वाटतो – चंद्रकांत पाटील

28

पुणे : अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाची साक्ष देणाऱ्या वाघनखांचे दर्शन पुणेकरांना घेता यावे, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निःशुल्क शिव-सृष्टी पाहण्याची अनोखी संधी कोथरुडकरांना उपलब्ध करून दिली आहे. कोथरुडकरांना हि अनोखी संधी उपलब्ध करून देताना विलक्षण आनंद वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले.

या उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी नावनोंदणी करण्याची विनंती पाटील यांनी केली. या उपक्रमांतर्गत शिव-सृष्टी पाहण्यासाठी कोथरूडरांनी ७/८- आनंद निलय को-ऑप. हाऊसिंग सो., कर्वे पुतळ्याजवळ येथे नावनोंदणी करावी. तसेच बाणेरमधील नागरिकांनी श्रॉफ-सुयश अपार्टमेंट, युनियन बॅंक ऑफ इंडिया शेजारी, बालेवाडी फाट्याजवळ तर औंधमधील नागरिकांनी शॉप नं. १, ओंकार कॉम्प्लेक्स, आंबेडकर चौक, औंध-डीपी रोड येथे नावनोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे.

नावनोंदणी करण्यासाठी 020-25440555/7507414115/020-42880542 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चला तर मग, इतिहासाच्या पानांवर आणि रयतेच्या मनावर कोरलेल्या या ऐतिहासिक वाघनखांचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला वंदन करूया, असे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.